OMM
A+ A A-
ओरेगन मराठी मंडळ ह्या वर्षीच्या गणपती उत्सवात आपले सहर्ष स्वागत करीत आहे!
कधी - शनिवार, २ सप्टेंबर २०१७

कुठे - PCC Rock Creek Event center (Bldg. No. 9)

पत्ता - 17705 NW Springville Rd. Portland, OR.

 

रूप-रेषा आणि अंदाजे वेळ -

१. सजावट आणि तयारी - सकाळी ७ ते ८

२. गणपती प्रतिष्ठापना आणि पुजन - सकाळी ८ ते १०

३. वार्षिक सर्वसाधारण सभा,  OMM घटनेमध्ये फेरबदल, नवीन कार्यकारणी समितीची घोषणा - दुपारी १० ते १२

४. जेवण - दुपारी १२ ते २

५. उत्तर-पूजा, विसर्जन आणि मिरवणुक - दुपारी २ ते ३

६. समारोप आणि आवराआवर - संध्याकाळी 3 ते ५

 

वरील वेळेत थोडा फेरबदल होऊ शकतो ह्याची कृपया नोंद घ्यावी. सकाळी ८ ते १० या वेळेत सर्वांसाठी अल्पोपहार खरेदीसाठी उपलब्ध

असेल.

 

*आजीवन सदस्यत्व असलेल्या आणि ३१ ऑगस्ट २०१७ रात्री १० वाजे पर्यन्त सदस्यत्व नूतनीकरण केलेल्या आणि नवीन सदस्यत्व स्वीकारलेल्या सर्वांना भोजन मोफत देण्यात येईल.
 
बिगर सदस्यांना जेवणासाठी $१५ शुल्क आकारण्यात येईल. तसेच ६ वर्षांखालील  मुलांसाठी जेवण विनामूल्य असेल. गणपतीच्या वेळेसच आपल्या मंडळाच्या सदस्यत्वाचे नूतनीकरण करण्याची वेळ असते.
 
सदस्यत्व शुल्क मात्र $६०* (संपूर्ण परिवारासाठी), $३०* (एका व्यक्तीस), $२० PSU / OSU विद्यार्थ्यांकरिता राहील. हे शुल्क आजच मंडळाच्या वेबसाईट www.oregonmm.org  वर भरा आणि मंडळाच्या अनेक कार्यक्रमांना सवलतीचे दर मिळवा.
 
सदस्यत्व घेताना आपल्या कुटुंबाची माहीती आम्हाला द्यायला विसरू नका. आपली माहीती सदस्यत्व नूतनीकरणासाठी आवश्यक आहे. माहीती येथे द्या -https://goo.gl/forms/T4a7nShQJXhNGhVy1
 
*आजीवन सदस्यांना सदस्यत्वाचे वरील नियम लागू होत नाहीत याची कृपया नोंद घ्यावी. आजीवन सदस्यांनी कृपया ३१ ऑगस्ट २०१७, रात्री १० वाजे पर्यन्त आम्हाला पुढे दिलेल्या RSVP लिंकवर आपली व आपल्या परिवाराची उपस्थिती कळवावी. - https://goo.gl/forms/T4a7nShQJXhNGhVy1

  

गणपतीच्या वेळेसच चालू कार्यकारिणीचा अवधी संपतो आणि नवीन कार्यकारिणीकडे मंडळाचा कारभार सुपूर्त होतो. तरी आपल्याला नवीन कार्यकारिणीत सदस्य व्हायचे असल्यास आपले नाव येथे नोंदवा -https://goo.gl/forms/Ln2Abe6AwtK79JLB2
 

कुठलाही मोठा कार्यक्रम स्वयंसेवकांशिवाय होऊच शकत नाही. गणपतीचा कार्यक्रम ह्याला अपवाद नाही. आपल्याला जर ह्या कार्यक्रमात स्वयंसेवक व्हायचे असल्यास आपले नाव येथे नोंदवा- https://goo.gl/forms/UsL7pAYHn1Wxf3s12

 

२०१६-१७ च्या कार्यकारिणी समितीचे समस्त सदस्य आपल्या सहकार्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार मानत आहेत.
 

धन्यवाद.

ओरेगन मराठी मंडळ