नमस्कार मंडळी,
आपला आनंद मेळा आहे उद्या, शनिवारी १८ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ वाजता South Meadows School मध्ये.
काय काय आहे म्हणता? पुरणपोळी, बासुंदी रबडी, साबुदाणा खिचडी, Lasagna, मटार कचोरी, जिलेबी, पाव भाजी, भेळपुरी आणि अर्थातच गरमागरम चहा! काय, तोंडाला पाणी सुटलं की नाही?😋
शिवाय मायलेकींसाठी मेंदीचा stall पण आहे.
उद्या भेटूया. बरोबर सुट्टे पैसे घेऊन या. Mela admission is FREE to members. Non-members will have to buy a ticket online for $5 each for admission. Everyone pays for their own food purchases 😁
खाण्याची यादी वाचून प्रेरणा आली असेल तर तुम्ही अजूनही तुमचा स्टॉल बुक करू शकता. टेबल/स्टॉल बुक करण्यासाठी कृपया खालील लिंक वापरा:
- सभासदांनी टेबल बुक करण्यासाठी ही लिंक वापरावी.
- इतरांनी टेबल बुक करण्यासाठी ही लिंक वापरावी.
स्टॉल कुठल्याही प्रकारचा असू शकतो – खाण्या-पिण्याच्या गोष्टी, पुस्तकं, दागिने, कपडे, non-profit संस्थेविषयी माहिती वगैरे. कृपया लवकरात लवकर बुक करा, कारण आपल्याकडे जागा मर्यादित आहे. टेबल बुक करण्यासाठी सभासदासांठी प्रत्येकी $३० आणि सभासद नसलेल्यांसाठी $५० फी आहे.
धन्यवाद !