|| वारसा जपू संस्कृतीचा, बंध जोडू मैत्रीचा ||
सप्रेम नमस्कार,
आम्हाला कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की सिॲटल् महाराष्ट्र मंडळ आयोजित “BMM प्रादेशिक मराठी मैत्री मेळावा -२०२३” ओरेगॉन महाराष्ट्र मंडळ आणि मराठी सोसायटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया हे व्हॅन्कुव्हर, कॅनडा मधील मंडळ यांच्या साथीने जुलै मध्ये संपन्न होत आहे.
हा आहे उत्सव आपल्या संस्कृतीचा, आपल्या मायबोलीचा, आपल्या मराठीपणाचा आणि आपल्यातील बंध घट्ट करणाऱ्या मैत्रीचा! ह्या सोहळ्यात असतील तिन्ही मंडळांचे सांस्कृतिक कार्यक्रम, शिवाय मराठी उद्योजकांच्या गाठीभेटी, मराठी शाळेतल्या मुलांचे कार्यक्रम, युवा संमेलन, ज्येष्ठ नागरिकांच्या गप्पाटप्पा – उत्तररंग, क्रिकेट, Karaoke असे अनेकविध कार्यक्रम.
हा मैत्री मेळावा आपल्या सर्वांसाठी संस्मरणीय आनंदयात्रा ठरेल अशी खात्री आम्ही नक्की देतो. मैत्री मेळाव्यास तुमच्या पाठिंब्याची, शुभेच्छांची आणि आशीर्वादाची गरज आहे. तेव्हा आमच्या ह्या सस्नेह निमंत्रणाचा स्वीकार करून आपण आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवार ह्यांच्या समवेत मैत्री मेळाव्यास अवश्य उपस्थित रहावे ही विनंती.
मैत्री मेळाव्याची संपूर्ण माहिती seattlemm.org ह्या वेबसाईटवर मिळेल.
–> तिकिटासाठी लिंक <–
आनंदाचा प्रत्यय यावा, तुमचा आमचा सूर जुळावा संस्कृतीचा सुंदर देखावा, मौजमजेचा अक्षय ठेवा सुंदर क्षणांचा असेल पुरावा, BMM मराठी मैत्री मेळावा
लवकरच भेटू.
दिनांक: २२ आणि २३ जुलै
Juanita High School, Kirkland
10601 NE 132nd St, Kirkland, WA 98034